सोनेरी जगातल्या सावल्या
प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही सोनेरी क्षण येत असतात. अथांग सागरकिनारी संध्याकाळच्या वेळी मावळत्या सूर्याच्या साक्षीने घालवलेल्या अशा काही आठवणींचा समावेशही या सोनेरी क्षणांमध्येच होतो. मुंबईच्या समुद्रकिनारी संध्याकाळी अनेक मंडळी हे सोनेरी क्षण अनुभवायला येतात. या मंडळींच्या आयुष्यातले हे सोनेरी क्षण मी अस्ताला गेलेल्या तेजोनीधीमुळे सोनेरी झालेल्या पाण्याच्या पार्श्वभूमीवरील आकृत्यांच्या रूपाने कॅमेऱ्यात टिपले. यासाठी माझ्याकडे असलेल्या टेलिलेन्सच्या वापर मी केला. या सावल्या टिपण्यासाठी फोटो दोन स्टॉप अंडर करणं भाग होतं. समुद्रकिना-यावर रमतगमत फेरफटका मारणारे, आईबरोबर घालवणारं मूल, कोळीबांधवांचा समुद्रकिनारी उभ्या असलेल्या होडय़ा, भरसमुद्रात उभा राहिलेला वांद्रे वरळी सी-लिंक, प्रेमाच्या आणाभाका घेणारं प्रेमी युगुल, हे सगळे या सावल्यांचे विषय बनले, मित्रांबरोबर केलेला टाईम पास या सावल्या टिपाल्या.
छाया- आदेश अ. पोखरे-चौधरी